न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- जमिनीवर मालकी हक्क असल्याचे सांगून चौघांनी मिळून एका हॉटेल मालकाचे अपहरण केले. त्यांना निर्मनुष्य ठिकाणी नेऊन मारहाण करीत आरोपींनी त्यांच्या खिशातील एक लाख रुपये समोर जबरदस्तीने काढून घेतले.
ही घटना गुरुवारी (दि. ३०) रोजी दुपारी दोनच्या सुमारास बाणेर येथे घडली. याप्रकरणी फुआराम रामाजी देवासी (३१, रा. बावधन खुर्द, मूळ रा. राजस्थान) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर चांदेरे, गणेश इंगवले आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणायात आला आहे.













