न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व झाडांची जोपासना करण्यासाठी वृक्षतोडीला व वृक्षछाटणीला परवानगी देण्यात येऊ नये. आवश्यक असल्यास महापालिकेच्या कर्मचा-यांकडून काम करून घ्यावे, अशी मागणी शिवशक्तीसंग्राम संघटनेचे विलास कुटे यांनी केली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केले आहे की, शहरात ठिकठिकाणी वृक्षतोडीच्या घटना घडत आहेत. त्यावर आळा घालणे गरजेचे आहे. मात्र बिल्डरांसह अनेक जण राजरोसपणे वृक्षतोड करत आहेत. पालिकेने वृक्षतोड करणा-यांवर कारवाई करावी. तसेच महापालिकेने वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घ्यावेत, अशी मागणी या वेळी कुटे यांनी निवेदनाद्वारे केली.













