न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- निवृत्त होईपर्यंत अधिकारी व कर्मचारी कर्तुत्वात कोणतीही कसूर न ठेवता आपल्या कामाच्या जागेबरोबरच कुटुंबाप्रति प्रामाणिक काम करतात. निवृत्तीनंतर मात्र त्यांच्या खांद्यावरील जबाबदारीचा बोजा कमी करून, त्यांची कुटुंबातील सदस्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत आ. महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील पीएमपीएमएल सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सन्मानानिमित्त ते बोलत होते. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, डेपो मॅनेजर शांतराम वाघेरे आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब हरगुडे, चंद्रकांत कड, रामदास हांडे, रघुनाथ डोंगरे, बाळासाहेब थोरवे यांचा सेवानिवृत्तनिमित्त आकर्षक सन्मानचिन्ह, पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.













