न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- शहरातील वाढती कचरा समस्या लक्षात घेता मोशी येथील कचरा डेपोची जागा भविष्यात अपुरी पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन, पुनावळे येथील राज्य सरकारच्या वन विभागाच्या ताब्यात असलेली २२ हेक्टर इतकी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे.
संबंधित जागेचा लवकर ताबा घ्यावा, असे पत्र अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (दि. २९) रोजी नगररचना उपसंचालकांना दिले आहे. महापालिका या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्पही राबवू शकते.
महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, “महापालिकेकडून सध्या कच-यापासून वीज निर्मिती हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित प्रकल्पातंर्गत कच-याचे यांत्रिकी पद्धतीने विलगीकरण करण्यात येत आहे. तसेच, प्रकल्पासाठी आवश्यक विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे.













