न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- मोशी कचरा डेपोतील कामकाजाच्या अनियमिततेबाबत सहायक आरोग्यधिकारी प्रभाकर तावरे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी केली आहे.
याबाबत रेंगडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन महापालिकेचे अतोनात नुकसान केल्याचे नुकतेच समोर आले आहे.
त्यांच्याबाबत यापूर्वीही तक्रार करुनही महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईबाबत अनास्था दाखविली. आता त्यांना पाठिशी न घालता कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.













