- शेकडो उद्योजकांनी घेतला लाभ..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२५) :- एकच ध्यास उद्योजकता विकास या उक्तीप्रमाणे अनेक गोष्टींवर चाकण MIDC उद्योजक संघटना काम करत असते. त्यातीलच एक भाग गेली 5 वर्षे चाकण MIDC उद्योजक संघटना दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी अव्यहातपणे उद्योजकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व संस्था यांना सेमिनार घेण्यासाठी आमंत्रित करीत असते. याचा प्रत्यक्षरीत्या फायदा हा उद्योजकांना होत असतो.
त्याप्रमाणे 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवार रोजी चाकण MIDC उद्योजक संघटनेने हॉटेल बर्डव्हॅली चिंचवड मध्ये Industrial Safety & Health या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सौ शारदा होंदुले मॅडम ( अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय महाराष्ट्र राज्य ) यांना आमंत्रित केले होते.
या सेमिनार मध्ये सौ शारदा होंदुले मॅडम यांनी ऊद्योजकांच्या मनातील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय या सरकारी खात्याविषयीचे सर्व अधिकार, जवाबदारी व कामे यांची इत्यंभूत माहिती दिली. एक सामान्य उद्योजकांच्या मनामध्ये नेहमीच या खात्याविषयी भीती राहिलेली आहे. पण संघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेला समोरासमोर मुक्त संवाद झाला त्यावेळेला उद्योजकांच्या मनातल्या अनेक शंका या दूर झाल्या. ज्यामध्ये फॅक्टरी ऍक्टचे लायसन्स काढणे का जरुरी आहे इथपासून उद्योजकांनी आपापल्या कंपनीनुसार कोणत्या प्रकारच्या कामगारांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी काम केले पाहिजे याची संपूर्ण माहिती सौ होंदुले मॅडम यांनी दिली. त्यांनी वेगवेगळ्या केस स्टडीज देखील उद्योजकांना सांगितल्या. प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये अनेक उद्योजकांनी वेगवेगळे प्रश्न तसेच त्यांच्या कंपनीमध्ये घडलेल्या घटना याविषयी मॅडमना प्रश्न विचारले असता त्याची अत्यंत समाधानकारक उत्तरे होंदुले मॅडम यांच्याकडून सगळ्या उद्योजकांना भेटली. शेवटी जाताना सौ होंदुले मॅडम यांनी स्वतःचा पर्सनल मोबाईल नंबर उद्योजकांना दिला व त्यांना अस्वस्थ केले की या खात्याविषयी कोणताही गैरसमज करू नका व शक्य तेवढी मदत आम्ही तुम्हाला करणारच आहोत, फक्त उद्योजकांनी पुढे यायला पाहिजे
एक ना अनेक प्रश्नांची ऊकल करत सखोल माहिती
सदर सेमिनारसाठी नेहमीप्रमाणे शेकडो ऊद्योजक ऊपस्थित होते. सदर सेमिनार मध्ये शेवटी एक छोट्या सत्रामध्ये MOOWR पॉलिसी विषयक देखील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले. की ज्यामध्ये आपण ज्या वेळेला परदेशातुन मशीन इम्पोर्ट करतो, त्यावेळेला एक्सपोर्ट न करता देखील इम्पोर्ट ड्युटी कशी आपल्याला भरावी लागणार नाही यासाठी सरकारची एक स्कीम आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सांगता चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे यांनी केली.
















