- यंदा प्रभाग क्रमांक २६ वाकड मध्ये परिवर्तन अटळ..
- स्नेहा कलाटे आयोजित ‘खेळ रंगला पैठणी’च्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
- ‘महा लकी ड्रॉ’ स्पर्धेत बक्षिसांची लयलूट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
विशालनगर / पिंपळे निलख (दि. ०१ डिसेंबर २०२५) :- “प्रभागातील महिलांचा असा उत्स्फूर्त आणि प्रचंड सहभाग पाहून मनापासून आनंद झाला. समाजाच्या एकूण प्रगतीसाठी महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांना सुरक्षित, सक्षम आणि संधींचे समान व्यासपीठ मिळाले पाहिजे. महिला सबलीकरणासाठी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन आपली क्षमता समाजासमोर मांडावी यासाठीचा रणजित आबा कलाटे फाउंडेशनचा हा कार्यक्रम अगदी स्त्युत्य आहे. महिलांचा असा विराट सहभाग म्हणजे समाज प्रबोधनाची प्रेरक दिशा आहे. महिलांचे सामर्थ्य समाजाची खरी शक्ती असून त्यांच्यासाठी सुरक्षित, सक्षम आणि संधीसमृद्ध वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे, असं प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार तथा भाजपा पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले.
रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा रणजित कलाटे यांच्या पुढाकारातुन प्रभाग क्रमांक २६ वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख व विशाल नगर या प्रभागातील महिलांसाठी शनिवारी (दि. २९) रोजी “खेळ रंगला पैठणीचा, सन्मान स्त्रीशक्तीचा” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार शंकर जगताप बोलत होते. या कार्यक्रमात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या या लाभलेल्या या ऐतिहासिक प्रतिसादाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कार्यक्रमात शेकडो महिलांनी पैठणी साड्या, तसेच लकी ड्रॉमधून पाच टू व्हीलर, पाच टीव्ही, पाच फ्रिज, पाच वॉशिंग मशीन व पाच मिक्सर ग्राइंडर अशी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकली. विजेत्यांना आमदार शंकरभाऊ जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व जान्हवी किल्लेकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, “महिला सक्षमीकरण हा केवळ कार्यक्रमाचा विषय नाही, तर समाजउभारणीचा मार्ग आहे. प्रभागातील महिलांचा या कर्यक्रमास लाभलेला उत्स्फूर्त सहभाग म्हणजे समाजातील सकारात्मक बदलाचे चिन्ह आहे. महिलांच्या प्रगतीसाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील आहे.
स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले : “ जमलेला हा महिलांचा समुदाय म्हणजे माझ्या सामाजिक कार्याची पावती आहे. स्त्री अत्याचाराविरुद्ध सर्वांनी एकत्र उभे राहणे गरजेचे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत संधी मिळाल्यास महिलांच्या शक्तीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी अधिक व्यापक काम करण्याचा माझा संकल्प आहे, असं सांगत कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला भगिनी व नागरिकांचे आभार मानले”.
‘महा लकी ड्रॉ’ स्पर्धेतील विजेते…
- प्रथम बक्षीस टु – व्हिलर – १) शितल सुभाष गायकवाड, २) सरिता संदीप गावडे, ३) मनिषा रामदास साबळे, ४) माधुरी सोमनाथ लकापते, ५) वर्षा योगेश मोरे,
- द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही ४३” – १) वैशाली जंबू वायदंडे, २) शैला सुनील वाघमारे, ३) अनुराधा सचिन बनसोडे, ४) सोनाली संतोष दरेकर, ५) पूजा राजेश जाधव,
- तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन – १) सरस्वती विलास जानकर, २) आरती संदेश अडागळे, ३) मालन सोमनाथ कस्पटे, ४) उज्वला सुनील चव्हाण, ५) सन्मती महावीर चौघुले,
- चतुर्थ बक्षीस फ्रीज – १) सत्यशीला महादेव लामतुरे, २) अश्विनी संतोष वाघमारे, ३) सारिका संजय आसबे, ४) मनोरमा रमेश येवले, ५) सारिका तुकाराम रोडे,
- पाचवे बक्षीस मिक्सर – १) सविता दिलीप गाडे, २) आशा साहेबराव शेरे, ३) करुणा देविदास पांचाळ, ४) विमल सुहास सोनीमिडीया, ५) उज्वला दत्तात्रय नलावडे या महिलांनी पटकावले.
















