न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२५) :- तळेगाव दाभाडे येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ३,६२,१७९ रुपये परस्पर खात्यात जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई फिर्यादी रोहित सुरेश खंडेलवाल (वय ३६, रा. देहरोड, पुणे) यांच्या तक्रारीनुसार करण्यात आली.
गुन्हा दाखल झालेला डॉ. संदीप भिमराव वानखेडे (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) या आरोपीने ३ मे २०२५ ते १० सप्टेंबर २०२५ या दरम्यान आर्थिक फायद्यासाठी बनावट वैद्यकीय कागदपत्रे तयार करून बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीकडे चार खोटे आरोग्य विमा दावे दाखल केले.
या CLAIMS च्या आधारे आयडीएफसी आय बँक, तळेगाव शाखेतील खात्यावर एकूण ३.६२ लाख रुपये ऑनलाईन प्राप्त करून कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉक्टर अद्याप अटकेत नाही. ही नोंद पो.उप.नि. खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
















