न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- महामेट्रोने कामाचा ठेका दिलेल्या मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेने कामगांरांचे मासिक पगार व पीएफ माहे डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत दिलेला नाही. तसेच काही कामगारांना कामावरून निलंबितही करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीविरोधात व महामेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. पुणे, कार्यकारी संचालक यांच्याविरोधात कायदेशिर फसवणूक, विश्वासघात, आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही खालील सहया करणारे मे. एचसीसी – अलफारा इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. व व महामेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. पुणे यांचे रेंजहिल ते पीसीएमसी मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. या कामासाठी आम्ही नोव्हेंबर २०१७ पासुन कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहोत. आमच्यापैकी अनेकजन भारताच्या विविध राज्यातून, जिल्हयातुन कामासाठी आम्ही पुणे शहरात आलेले आहोत. वरील कंपनीमध्ये आम्ही जवळपास १०० कंत्राटी कामगारांनी इमानेइतबारे या कंपनीत काम केलेले असताना आम्हाला डिसेंबर २०१८ पासून या कंपनीने पगार / वेतन दिलेले नाही. आमचा पी. एफ / आयकर भरलेला नाही. म्हणून आम्ही ओरड सुरू केली. त्यावेळी कंपनीचे अधिकारी / प्रोजेक्ट डायरेक्टर अनिल बीराजदार व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी आमच्य काही कामगारांना जबरदस्तीने दमदाटी करून एक दोन महिण्यांचे वेतन / पगार देऊन हुसकावून लावले. अनेक कामगार एक किंवा दोन महिन्याचे वेतन घेऊन वेगवेगळ्या राज्यात निघुन गेले. यापैकी काही कामगारांचे तीन-चार महिन्याचे वेतनाचे पैसे सदर कपनीनीच्या अधिका-याने हड़प केले आहेत.
त्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला मे. एचसीसी-अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या साईट कार्यालयासमोर उपोषण / आंदोलन करण्याची सुचना केली. त्यांच्या सल्यानुसार आम्ही १ मे. २०१९ रोजी कामगार दिनापासुन अमरण उपोषणाला सुरुवात केली. १३ मे २०१९ रोजी मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीचे पोजेक्ट डायरेक्टर अनिल बिराजदार यांनी आमच्यापैकी काही कामगारांना कामाची अंदाजे रक्कम ३५, ५९, ८५४ / – या रक्कमेचा धनादेश दिला. यावेळी कामगार आयुक्त कार्यालयाचे श्रीधरन एन व वैभव अबादुले तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे रंजीत कुमार व पिपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, तळेगाव नगरपालीकेचे नगरसेवक माने यांच्या उपस्थितीत वेतनाची उर्वरित रक्कम दिनांक १७ /०५ / २०१९ रोजी व ३१ /०५ /२०१९ रोजी अशा दोन टप्यात देऊ, असे पत्र ०३ मे २०१९ रोजी अनिल बिराजदार यांच्या सहीचे पत्र दिले. त्याप्रमाणे १७ /०५/ २०१९ रोजी ९, ४८, ५३०/- या रक्कमेचे धनादेश दिले व ३१/०५/ २०१९ रोजी उर्वरित पगाराची त्यांची मुदत संपल्यामुळे आम्ही मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या साईट कार्यालयावर पुन्हा उपोषण अंदोलन सुरू केले.
त्यामुळे मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. श्री चीमनलाल गंगारामानी, नितेश गंगारामानी पत्ता – १०१ / १०२, पहिला मजला, बाबा हाऊस सिनेमेक्स थिएटरजवळ, चकाला, अंधेरी कुर्ला रोड अंधेरी (पुर्व) मुंबई ४०००१३ आणि अनिल बिरादार पोजेक्ट डायरेक्टर में-अलफा इंफाप्राजेक्टम् प्रा . लि . व एसीसी मुख्य कार्यकारी संचालक अजित गुलाबचंद व संतोष रॉय, पत्ता हिनकॉन हाऊस, विक्रोळी मुंबई आणि महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लि. डॉ. बिजेस दिक्षीत पत्ता, मेट्रो हाऊस, बंगला न. २८ / २, आनंदनगर, सीके नायडू क्षेत्र, सिव्हील लाईन नागपुर (महाराष्ट्र) आणि महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लिमीटेडचे गौतग बिऱ्हाडे, कार्यकारी संचालक पत्ता १०१, ओरिओन बिल्डींग, डॉन बॉस्को सेंटरच्या विरुध्द बाजुला, कोरेगाव पार्क पुणे ४११००१ या सर्वांनी आम्हा कामगारांची पीएफची रक्कम भरली नाही, तसेच आम्हाला डीसेंबर २०१८ पासुन वेतनापासुन वंचीत ठेऊन संगणमताने आर्थिक अफरातफर करून, आम्हा कामगारांचे व आमच्या कुटुंबीयांचे आर्थिक, शारीरीक, मानसिक फसवणुक केलेली आहे. त्यामुळे आमचे व आमच्या कुटुंबीयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्वाच्या विरोधात कायदेशिर तक्रार असून ती कायदयाप्रमाणे नोंदवून संबंधितांवर कायदयाप्रमाणे गुन्हा नोंदवुन कठोर कार्यवाही करावी, असे या पत्रात कामगारांनी म्हटले आहे. या पत्रावर कामगारांच्या सह्या आहेत.











