- ‘घड्याळ’ चिन्हाकडे मतदारांचा कल.
- प्रचाराला युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ४ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, प्रचाराच्या प्राथमिक टप्प्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रभागात उत्साहवर्धक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार अ) सुमित रघुनाथ डोळस, ब) सौ. अश्विनी चंद्रकांत तापकीर, क) सौ. अनिता केलास थोपटे आणि ड) सागर खंडूशेठ कोकणे यांच्या प्रचाराभोवती सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
सोसायट्यांत, कॉलनी परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण तसेच महिला आणि युवकांसाठी सशक्त योजना राबवण्याच्या आश्वासनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तरुण वर्ग, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी पदयात्रा व प्रचार सभांना उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून आपला पाठिंबा जाहीर केला.
प्रभागातील विविध सोसायटींमध्ये होत असलेल्या भेटीगाठींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अनुकूल वातावरण जाणवत असून, ‘स्थैर्य आणि विकासाची हमी” या संदेशाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद आहे. घराघरांत पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण प्राधान्याने करण्याचा शब्द दिला
नेतृत्व अनुभव, संघटित प्रचार यंत्रणा आणि लोकाभिमुख धोरण यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. मतदारांनी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना बहुमताने विजयी करून देण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले असून, मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.












