- सोसायट्यांमधून भाजपच्या विकासकेंद्रित धोरणांना मतदारांचा वाढता पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. 04 जानेवारी 2026) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर–रहाटणी येथील भाजपा अधिकृत उमेदवार सौ. अनिताताई संदीप काटे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत जनसंपर्काचा धडाका उडविला.
प्रचारादरम्यान विविध सोसायट्यांमध्ये भेट देत त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर ठोस उपाययोजना मांडल्या. दरम्यान नागरिकांनी भाजपाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत पाठिंबा जाहीर केला. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक कोंडी, उद्याने, सुरक्षा यांसारख्या स्थानिक प्रश्नांबरोबरच शहराच्या नियोजनबद्ध विकासाबाबतही चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाच्या विकासकेंद्रित भूमिकेची, ठोस धोरणांची आणि भविष्याचा स्पष्ट रोडमॅप असलेल्या दृष्टीकोनाची माहिती जनसंवादातून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
अनिताताई काटे यांनी प्रभागातील सुरू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांची माहिती देत, नागरिकांच्या सहभागातून लोकाभिमुख निर्णय राबविण्याची हमी दिली. प्रभागाचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेवटी, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि सोसायटीतील नागरिकांना येत्या 15 जानेवारीला ‘कमळ’ चिन्हाचं बटन दाबून माझ्यासह भाजपच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
“प्रभाग 28 च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि सुटसुटीत वाहतूक व्यवस्था यांना प्राधान्य देत नागरिकांसोबत मिळून काम करू. भाजपा उमेदवारांना आपला भक्कम पाठिंबा द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाचा वेग वाढवा.”
– अनिताताई संदीप काटे (भाजपा उमेदवार प्रभाग क्रमांक 28)…












