- प्रभाग २७ मध्ये भाजपचे उमेदवार चंद्रकांत नखातेंसह अन्य उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०६ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगर) मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोमात सुरू आहे. “पुढील पाच वर्षे विकासाची असतील. प्रभागातील प्रत्येक प्रलंबित कामाला न्याय देण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन” चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांनी केले.
भाजपचे अधिकृत उमेदवार ड जागा चंद्रकांत (आण्णा) बारकू नखाते आणि क जागा अर्चना विनोद तापकीर यांच्या प्रचार यात्रेत सोमवारी आमदार जगताप सहभागी झाले. काळेवाडी, ज्योतिबा नगर आणि तापकीर नगर परिसरात काढलेल्या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चंद्रकांत नखाते म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचारादरम्यान घरोघरी, सोसायटीत भेट देत मतदारांशी संवाद साधत आहे. प्रभागात भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे. बहुमताने निवडून आल्यास रस्ते, पाणी, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणी दूर करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करू. जनतेचा आशीर्वाद मिळाला तर कामाला वेग देऊ.”












