- भाजप उमेदवारांच्या प्रचारात वाढतोय मतदारांचाही सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०६ जानेवारी २०२६) :- काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर या प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांच्यासह अ) पाडळे निता विलास, ब) क) विनोद जयवंत नढे आणि ड) हर्षद सुरेश नढे घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत.
सोमवार (दि. ०५) रोजी विजयनगर येथील शांती कॉलनी १, २ व ३ परिसरात प्रचार करण्यात आला. “चार बटणे कमळाची- पाच वर्षे विकासाची” या घोषणेसह उमेदवारांनी विकासकामांची माहिती नागरिकांना दिली.
कोमलताई सचिन काळे म्हणाल्या, “प्रभागातील प्रत्येक भागात मूलभूत सुविधा वाढवणे, महिलांसाठी सुरक्षितता, तरुणांसाठी संधी आणि ज्येष्ठांसाठी सोयी निर्माण करणे हा आमचा संकल्प आहे. जनतेचा विश्वास मिळाला तर कामाला गती देत प्रभाग आदर्श बनवू.”
येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.












