- पदयात्रा, कोपरा सभा आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मतदारांशी थेट संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०६ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत बदलाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कुतूहल आणि चर्चा वाढताना दिसत आहे. दैनंदिन प्रश्नांवर उपाय सुचवणारी भूमिका आणि शांत, संयमी प्रचारपद्धतीमुळे पक्षाकडे लक्ष वेधले जात आहे.
प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ड) माजी नगरसेवक संतोष कोकणे यांच्यासह अ) मोनिकाताई नवनाथ नढे, ब) उषा दिलीप काळे आणि क) मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर हे नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन सूचना व तक्रारी ऐकून घेत आहेत.
दरम्यान सोमवार (दि. ०५) रोजी संघर्ष कॉलनी, गोकुलधाम कॉलनी, पाटील हॉस्पिटल परिसर, नढेनगर आणि कोकणेनगर भागात प्रचार फेरी पार पडली.
यावेळी संवाद साधताना संतोष कोकणे म्हणाले, “प्रभागातील कामांना दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मुलभूत सुविधा मजबूत करणे, स्वच्छ व सुरक्षित परिसर तयार करणे आणि प्रत्येक भागासाठी ठोस नियोजन करणे याला आम्ही प्राधान्य देऊ. नागरिकांनी दिलेला विश्वास आम्ही कामातून परत करू. त्यासाठी येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला भरघोस मतदान करून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा”, असं आवाहन त्यांनी केलं.












