- प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला वेग..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०६ जानेवारी २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार होताना दिसत आहे. विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारा पक्ष म्हणून अनेक नागरिक राष्ट्रवादीकडे अपेक्षेने पाहत आहेत.
दरम्यान प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र (तात्या) तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू आहे. अ) मोनिकाताई नवनाथ नढे, ब) काळे उषा दिलीप आणि ड) कोकणे संतोष अंकुश हे उमेदवार नागरिकांशी संवाद साधत आहेत.
सोमवार (दि. ०५) रोजी संघर्ष कॉलनी, गोकुलधाम कॉलनी, पाटील हॉस्पिटल परिसर, नढेनगर आणि कोकणेनगर भागात प्रचार फेरी घेण्यात आली.
यावेळी मच्छिंद्र तापकीर म्हणाले, “प्रभागातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे, नियोजनबद्ध आणि जबाबदार प्रशासन देण्याचा आमचा संकल्प आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन प्रभागाचा दर्जा उंचावू. नागरिकांचा विश्वास जपणे हेच आमचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला मतदान करून परिवर्तन घडवा, असं आवाहन त्यांनी केले.












