- क्रीडांगणे, वाचनालये आणि रोजगारमूलक उपक्रमाचा केला संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०७ जानेवारी २०२६) :- महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ चे ‘ड’ जागेवरील अधिकृत भाजपा उमेदवार हर्षद सुरेश नढे यांनी आदर्शनगर परिसरात घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तरुणांच्या हातात क्षमता आहे, परंतु योग्य संधींची गरज आहे. त्यामुळे प्रभागात क्रीडा संकुले, व्यायामशाळा, वाचनालये आणि कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान तरुणांनी खेळण्यासाठी क्रीडांगणे, नागरिकांनी दर्जेदार स्ट्रीट लाईटसह पीएमपी बसेसची संख्या वाढविण्याची विनंती केली. हर्षद नढे यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून ही कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तरुण, विद्यार्थी आणि कुटुंबांसाठी सोयीस्कर, सुरक्षित आणि स्वच्छ प्रभाग तयार करणे हीच माझी प्राथमिकता राहील, असे हर्षद नढे म्हणाले.
१६ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सक्रीय असून, विकासाच्या बाजूने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.












