- विनोद जयवंत नढे यांच्या अनुभवावर मतदारांचा ठाम विश्वास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांच्या भाजप प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली आहे. प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या अनुभवामुळे भाजप अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी सह उमेदवार निता पाडळे, कोमलताई सचिन काळे आणि हर्षद सुरेश नढे यांच्यासह प्रेमलोक, साईनाथ, सहयोग, शिवकृपा व चतुश्रृंगी कॉलनी परिसरात प्रचार केला. या प्रचारादरम्यान नागरिकांनी स्वतःहून “आमची भाजपा – आपली भाजपा” अशा घोषणा देत उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.
स्थानिक गणेश मित्र मंडळे, महिला बचत गट आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना सामूहिक पाठिंबा दिला. नियोजित विकास, शिस्तबद्ध प्रशासन आणि दीर्घकालीन कामांसाठी भाजप हाच योग्य पर्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
प्रभागाचा स्मार्ट, नियोजित आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी कमळाला मतदान करून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन विनोद जयवंत नढे यांनी केले.












