- कोमलताई सचिन काळे यांना महिलांचा आणि बचत गटांचा भक्कम पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रभागात सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या प्रचार फेरीत महिलांचा सहभाग आणि नागरिकांचा उत्साह विशेषत्वाने दिसून आला.
भाजपच्या अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांनी विनोद जयवंत नढे, हर्षद सुरेश नढे, नीता पाडळे यांच्यासह प्रेमलोक कॉलनी, साईनाथ कॉलनी, सहयोग कॉलनी, शिवकृपा कॉलनी आणि चतुश्रृंगी कॉलनी येथे घरोघरी भेटी देत प्रचार केला. महिलांशी संवाद साधताना त्यांनी स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सुरक्षितता आणि बचत गटांच्या सक्षमीकरणाबाबत ठोस भूमिका मांडली.
या प्रचारादरम्यान प्रभागातील विविध गणेश मित्र मंडळे, महिला बचत गट तसेच स्थानिक नागरिकांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना सामूहिक पाठिंबा जाहीर केला. “महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारा पक्ष म्हणून भाजपवर विश्वास आहे,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.
प्रभागाचा स्मार्ट, सुरक्षित आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी कमळाला मतदान करून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन कोमलताई सचिन काळे यांनी केले.












