- महापालिकेची आज सर्वसाधारण सभा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा आज गुरुवारी (दि. ६) रोजी दुपारी २ वाजून वीस मिनिटांनी होणार आहे. तर, पालिका आयुक्तांनी सादर केलेला सन २०१९ – २० च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी विशेष सभा १५ जूनला आयोजित केली आहे.
गुरुवारी होणा-या सभेसमोर केवळ घरगुती वैयक्तिक शौचालय अनुदानास मान्यता देण्याचा एकमेव विषय आहे. विविध विषय समिती मंजुरी सदस्यांच्या निवडी मागील सभेत करण्यात आल्या आहेत.
या सभेत पालिकेच्या लाचखोर १६ अधिकारी व कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा विषय गाजण्याची शक्यता आहे. याप्रकरणी चर्चा झाल्यास सत्ताधारी व विरोधकही पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याची दाट शक्यता आहे.













