न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षण विभागाच्या अॅम्युनेशन फैक्टरीची १६ हजार १२२ चौरस मीटर जागा पालिकेस लागणार आहे.
या जागेच्या मोबदल्यात राज्य शासनाने काही ठिकाणी जागा देण्याची तयारी नुकतीच दर्शविली आहे. त्या संदर्भात नुकतीच पुण्यातील लष्करी अधिका-यांशी चर्चा करण्यात आली. पालिकेच्या वतीने १.८८ किलोमीटर अंतराचा पूल बांधण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सुचनेवरून जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणे जिल्ह्यातील दिघी व भावड़ी तसेच, इतर ठिकाणच्या जागांचा पर्याय संरक्षण विभागासमोर ठेवला आहे.
यावेळी सीएमई, अॅम्युनिशन फैक्टरी, संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.













