न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- शनिमहाराज जयंती उत्सवानिमित्त थेरगाव येथील जय हनुमान व श्री शनिदेव सेवा ट्रस्टच्या वतीने सोमवारी (दि. ३) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी सहा वाजता श्रींची महापूजा व होमहवन, दुपारी बारा वाजता शनिमहाराज जन्मसोहळा आणि दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.











