सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२६) :- पिंपरीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, फार्मसी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच लाखोंच्या इंजेक्शनची चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२६ पासून ते १२ मार्च २०२६ दरम्यान वारंवार घडल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी संदिप सुबराव लाखे (वय ४५ काळेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रथमेश रमेश शिंदे (वय २५, रा. चिखली) हा संबंधित हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये काम करत होता. त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फार्मसीतील सुमारे ५,२२,०३५ रुपयांच्या किमतीची इंजेक्शन्स लबाडीने चोरून नेल्याचा आरोप आहे.
हा गुन्हा १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.५६ वाजता नोंदविण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे हॉस्पिटल प्रशासनात खळबळ उडाली असून, अंतर्गत सुरक्षा आणि औषध साठ्याच्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.














