- पासपोर्ट पडताळणीबाबत विशेष प्रशिक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मार्च २०२६) :-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेबाबत विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार १२ मार्च २०२६ रोजी आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे हे सत्र पार पडले.
या प्रशिक्षणात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव, उप पासपोर्ट अधिकारी श्रुती पांडे तसेच विशेष शाखेतील अधिकारी व विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचारी उपस्थित होते.
सत्रात पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक जलद, अचूक व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP 2.0) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी पोलीस व पासपोर्ट विभागातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा देण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.








