- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) राज्य सरकारच्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ पुणे विभागात प्रथम आणि राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावून भव्य यश संपादन केले आहे. मुंबईत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आयोजित सोहळ्यात पीएमआरडीएला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या मोहिमेत कार्यालयाचे ई-ऑफिस, डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि GIS यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासकीय कामकाजात प्रभावी वापर करण्यात आला. तत्कालीन महानगर आयुक्त Dr Yogesh Mhase, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला आणि अधिकारीवर्गाच्या प्रयत्नांमुळे ही सुधारणा यशस्वी झाली.
यामुळे पीएमआरडीएच्या कामकाजात पारदर्शकता, वेग आणि डिजिटल सुलभता वाढली असून, नागरिकांना सेवा अधिक वेगवान आणि परिणामकारक स्वरूपात मिळत आहेत.








