न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- ओरा किड्स प्रि स्कुल अँड डे केअर चे उद्घाटन रविवार (दि. ९) रोजी नगरसेवक विनोद नढे व नगरसेविका निता पाडाळे व तुकाराम हापसे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री नितीन खेडकर यांनी केले. त्यांनी उपस्थितांना स्कुल च्या नाविन्य पूर्ण संकल्पनेबद्दल, वेगवेगळ्या वयाच्या मुलानुसार त्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासावर आधारित साधनांची व वार्षिक नियोजनाबद्दल माहिती दिली. या स्कुल चा अभ्यासक्रम हा मुलांच्या शारीरिक विकासावर केंद्रित असणार आहे. मुलांना जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ज्ञान कसे मिळेल यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी नढे व पाडाळे, तुकाराम हापसे महाराज यांची भाषणे झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्कुल च्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
आभार प्रदर्शन आनंदा कुदळे व सुखदेव खेडकर यांनी केले.











