न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती घेण्यासाठी आलेल्या सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती तसेच त्यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत महापौर राहुल जाधव यांनी केले.
आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त कक्षात झालेल्या या बैठकीमध्ये सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना पक्षनेते राहुल कलाटे,
जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, नगरसदस्या निर्मला कुटे, आरती चौधे, भिमाबाई फुगे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाज विकास
अधिकारी संभाजी ऐवले, प्रशासन अधिकारी रमेश भोसले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे या सह सोलापुर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती कुमुद अंकाराम, नगरसदस्या सावित्रा सामल, श्रीदेवी फुलारे, विजयलक्ष्मी जउम, निर्मला तांबे महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. आर. कस्तुरे, सहाय्यक आयुक्त महिला व बालकल्याण अधिकारी एम. ए. नराल, अंकाराम आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना नागरवस्ती विकास योजनांची महिती सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे व संगणक विभागाचे सुधीर बोराडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन
रमेश भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार महापौर राहुल जाधव यांनी मानले.