न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अभिवादन करण्यात आले.
महापौर रवि लांडगे यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीतील राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेत सामाजिक एकता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
“देशाच्या अखंडतेसाठी आणि शांततेसाठी एकत्र राहू,” अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी केली.
उपमहापौर शर्मिला बाबर, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.














