न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती दरवर्षी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून २६ जूनपूर्वी शाहूसृष्टीचा आकर्षक व आराखडा तयार केला जाणार आहे. त्याचे सादरीकरण त्याच दिवशी केले जाईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (दि. १३) रोजी सांगितले.
पालिकेतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव साजरा केला जातो. त्याची आढावा बैठक पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात गुरूवारी झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.
याबाबत पवार म्हणाले की, शाहू महाराज पुतळा परिसरात शाहसृष्टी उभारण्यात येत आहे. त्याचा खर्च ७० लाख इतका आहे. त्याचा आराखडा कलादिग्दर्शक नितीन देसाई हे करीत आहे. हा आराखडा २६ जूनपूर्वी सादर करण्यात येईल.















