न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पालखी सोहळ्यासाठी वारक-यांना सोईसाठी वल्लभनगर आगारातून जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. पंढरपुरच्या आषाढी यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी पालखी प्रस्थान यात्रेसाठी देहू व आळंदीत येतात. त्यांना कुठल्याही प्रकाराची अडचण होणार नाही, यासाठी आगाराकडून तीन दिवस जादा बसेसच्या फे-याचे नियोजन करण्यात आले आहे.
वारक-यांसाठी २४ ते २६ जूनदरम्यान जादा बसेस धावणार आहेत. २४ जूनला स्वारगेट-आळंदीसाठी ४ बसेस, २५ जूनला आळंदी-देहू ४ बसेस, २६ जून रोजी आळंदी पुणे अशा एकूण दहा जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.















