न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- आरोपी संगीता शहा हिने गिरीश सचदेव यांना फोन करुन तुमच्या ‘अनधिकृत बांधकामाबाबत मी महापालिकेत तक्रार दिली आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी मला पाच ते दहा लाख रुपये दे. तरच मी तक्रार मागे घेईन’ अशी धमकी दिली.
तर, एक अनोळखी व्यक्ती आठवड्यापूर्वी फिर्यादी सचदेव यांच्या पिंपरीतील दुकानात आला. ‘तू संगीता शहा यांचे पैसे देऊन विषय संपवून टाक. नाही तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी फिर्यादी सचदेव यांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी गिरीश सुरेश सचदेव (वय ३५, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगीता शहा (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही), एका ३२ वर्षाच्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.















