न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगाने २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी मोहिमेचे वेळापत्रक, कार्यपद्धती आणि विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत एन्युमरेशन फॉर्मचे वाटप सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून हरकती व दावे निकाली काढल्यानंतर अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांनी भागनिहाय बीएलए-२ नियुक्त करून मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. उपस्थित प्रतिनिधींनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.















