न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवार, १६ जून रोजी, म्हणजेच उद्या हा विस्तार होणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नव्या विस्तारात मावळचे भाजपा आमदार व जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांना मंत्रीपदाची संधी मिळाल्याचे विश्वसनीय वृत्त असून, प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी भेगडे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तयारी करण्याच्या तशा सूचना दिल्याचे समजते. तसेच दानवे यांनी भेगडे यांचे अभिनंदनही केले असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून आले आहे.
त्यामुळे चिंचवड विधानसभेचे आमदार जगताप व भोसरी विधानसभेचे आमदार लांडगे यांना नेहमीप्रमाणेच हातावर तुरी देत, मुख्यमंत्र्यांनी निष्ठावंतांला झुकते माप देत मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे समजते.