न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- देहूत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चांदीची पालखी, अब्दागिरी, चांदीच्या पादुका, गरूडटक्के, चवरी, चांदीची प्रभावळ, चौरंग आदी साहित्याला झळाळी देण्याचे काम पूर्ण झाले असून, चांदीच्या पालखी रथाला झळाळी देण्यात आली.
पालखी प्रस्थानापूर्वी आणखी एकदा झळाळी देण्यात येणार असल्याचे विश्वस्त आणि सोहळा प्रमुखांनी सांगितले. पिंपरीतील घनश्याम गोल्ड सुवर्ण पेढीचे मालक घनश्याम वर्मा यांना यावर्षी पालखी रथासह पालखी व अन्य चांदीच्या साहित्याला झळाळी देण्याचा मान मिळाला आहे.













