न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पिंपरीच्या काळेवाडी येथील पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित शाखेची संचालक मंडळाची सभा शुक्रवार (दि. १४) रोजी पार पडली. यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक बी. टी. लांवड यांच्या अध्यक्षतेखाली २०१९ ते २०२० या कालावधीसाठी विद्यमान संचालक श्रीमंत शितोळे यांची अध्यक्षपदी आणि शिवाजी बर्गे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तसेच संचालक सदस्य उपस्थित होते. सद्यस्थितीत बँकेचा एकूण व्यवसाय ३०० कोटींच्यावर असून तो पुढील वर्षात ५०० कोटीपर्यंत वाढवण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केला.













