न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- राज्यातील महापौरांची २० वी महापौर परिषद येत्या २५ व २६ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दोन दिवसीय महापौर परिषद घेण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या परिषदेला राज्यातून तब्बल २७ महापौर उपस्थित राहणार आहेत.
महापौर परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबईचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर, व उपाध्यक्ष तथा नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी आयोजनाची संधी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिली आहे.
यावेळी उड्डाणपुल, क्रीडांगणे, उद्याने, सायन्स पार्क, प्रेक्षागृहे, स्मशानभूमी असे प्रकल्प दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.













