न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना दिले आहेत.
त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत साने यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला जाणार आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येऊन पंधरा दिवस उलटले होते. परंतु, साने यांना पक्षाकडून तशी रितसर माहिती अथवा आदेश आलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी पदावर राहून काम करण्याची जबाबदारी पार पाडली.













