न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसा निमित्ताने स्व. राजिव गांधी प्रतिष्ठान व चिंचवड ब्लॉक कमिटीच्या वतीने आज बुधवार (दि. १९) रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीवर महाअभिषेक करण्यात आला.
राहुल गांधी यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्याच्या व त्यांच्या नेतृत्वाला खंबीर बळकटी मिळावी यासाठी माऊलींच्या संजीवन समाधीवर प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी प्रतिठाणच्या वतीने युवकांना हरीपाठाची पुस्तके व शंभर पसायदानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या.
यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदेशकुमार नवले, काॅग्रेसचे नेते आबा खराडे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सरचिटणीस दिपक थोरात, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित शेळके, काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराज, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, पिंपळे गुरव-सांगवी युवक उपाध्यक्ष अरनव कामठे, जयराम शिंदे, कृष्णा लोखंडे, विलास साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानानी करण्यात आली.













