न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि १९ जून २०१९) :- आखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने आज ईमारत क्रं १ परिसर, अजंठानगर वसाहत, चिंचवड येथे सायं ५ वा. मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीरातून सुमारे २५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डोळे, पल्स, रक्तदाब, हाडे व जोडांची तपासणी तसेच साधारण शारिरीक तपासणी करण्यात आली व आवश्यक औषध गोळ्या ची माहिती लिहून देण्यात आली.
राहुल गांधी यांचा वाढदिवस विधायक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय युवक काँग्रेसने घेतला आहे. याच हेतुने हे मोफत आरोग्य शिबीर तपासणी घेण्यात आल्याचे युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
या प्रसंगी माजी नगरसेवक विश्वास गजरमल, उमेश खंदारे (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय ) डाॅ. वसीम ईनामदार (अध्यक्ष पिं चिं शहर जिल्हा एन एस यू आय) हिराचंद जाधव (अध्यक्ष पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस) नासीर चौधरी (अध्यक्ष भोसरी विधानसभा युवक काँग्रेस) विरेंद्र गायकवाड (सरचिटणीस पिं चिं युवक काँग्रेस) सौरभ शिंदे (उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस )सैजाद चौधरी,सिध्दार्थ वानखेडे, अनिल सोनकांबळे आदि पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.













