न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढीवारी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना भेट म्हणून पंखवाज दिला जाणार आहे. त्याचा खर्च सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून तातडीने दिला जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी (दि. १९) रोजी दिली.
महापौर जाधव यांनी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व सहमतीने दिडीप्रमुखांना पखवाज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो खर्च पालिकेकडून न घेता नगरसेवकांच्या मानधनातून केला जाणार आहे. एकूण ७५० दिंडीप्रमुखांना पखवाज भेट दिले जाणार आहेत. हे पखवाज तातडीने खरेदी केले जाणार आहेत, माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.













