न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड पतंजली योग समितीच्या वतीने शहरासह जिल्हयातील विविध ठिकाणी शुक्रवारी (दि. २१) रोजी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी वाकड, निगडी, चिंचवड, भोसरी, किवळे-देहरोड, तसेच राजगुरुनगर, आंबेगाव आणि जुन्नर या ठिकाणी योग दिन होणार आहे.
त्याचप्रमाणे विविध शाळा, महाविद्यालय, कंपन्यांमध्ये शिक्षक जाणार आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १३ बॅडमिंटन हॉलमध्ये ७ ते ८ या वेळेत योगदिन होईल. त्याचा जास्तीत जणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रभारी मिलिंद वालझाडे यांनी दिली.













