न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दरवर्षी हजारो झाडे लावली जातात. यंदा दीड लाख रोपे लावली जाणार आहे. त्या रोपांची तसेच, गेल्या वर्षी लावलेल्या झाडांची प्रत्यक्ष पाहणी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य करणार आहे. उद्यान विभागाच्या ढिसाळ कारभारावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीची मासिक सभा सोमवारी (दि. १७) रोजी झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त श्रावण हर्डीकर होते.
तळवडे, रूपीनगर भागांत झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. गतवर्षी लावलेली झाडे व नव्याने लावण्यात येणा-या रोपांची पाहणी समितीचे सदस्य करणार आहेत. त्यातील किती झाडे जगली व जळाली हे पाहणीतून समोर येणार आहे.













