न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- संत तुकाराम नगर येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या वतीने आज शुक्रवार (दि. २१) रोजी ५ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सचिन नाईक (योगप्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग) यांनी विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके घेतली. यावेळी विद्यालयाचे प्र. प्राचार्य श्रीकांत कदम, उप मुख्याध्यापक डॉ. राजेंद्र कोकणे, प्राथमिकचे मुख्याध्यापक संजय जाधव सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. संपत गर्जे यांनी केले तर, आभार प्रदर्शन वामन भरगंडे यांनी केले.


















