- माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी उभारलेल्या चळवळीला उजाळा…
- ९३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२६) :- माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करून कामगार चळवळीला व्यापक दिशा देणारे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने चिंचवड येथे अभिवादन करण्यात आले. के. एस. बी. चौकातील स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपनेते तथा कामगारनेते इरफानभाई सय्यद म्हणाले, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी मोठा संघर्ष उभारला. कामगारांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देतानाच त्यांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. त्यांनी उभारलेली कामगार चळवळ आजही लाखो कष्टकरी कामगारांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे जतन आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
माथाडी कामगारांच्या विविध समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि कामगार कल्याणाच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अण्णासाहेब पाटील यांची चळवळ ही केवळ एका घटकापुरती मर्यादित नसून कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठीचा व्यापक लढा असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड शहर पुणे जिल्हाध्यक्ष हनुमंत तरडे, पुणे जिल्हा संघटक प्रदीप धामणकर, मारुती अप्पा कवदरे, नागेश वनवटे, रवि गोडेकर, सर्जेराव कचरे, अशोक साबळे, सुरेश ठीक, अविनाश भोसले, संदीप जांभळे, रोहित नवले, युवराज पोतेकर, अजय भोर, किरण देवकर, गणेश देवडकर, सुरज गुजर, अमित पासलकर, सुनील सावळे, अमृत शिंदे, अविनाश जांभळे, नाना नाईकवाडे, संदीप साबळे, गणेश नाईकवाडे, आयुष शिंदे, रत्नाकर भोजने, विक्रम मोरे, सोमनाथ डफळे, समर्थ नायकवडे, सुभाष पुजारी, महेश पार्टे, सागर पवार, बालाजी खैरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम आणि मोठ्या संख्येने सभासद कामगार उपस्थित होते.


















