- तीन पत्ती जुगार जोमात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२६) :- बिजलीनगर परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ लाख ३ हजार १०० रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य, पत्त्यांची पाने आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बिजलीनगर येथील अमृततुल्य चहाच्या दुकानाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज नरसींगराव बिराजदार (वय ५६), निखील अनिल बिरादार (वय २२) आणि मनोज युवराज चौधरी (वय ३७) हे पैसे लावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पोलीस शिपाई मनोज जनार्दन पांढरे यांनी फिर्याद दिली. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

















