न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने रूपीनगर, निगडी येथील बेकायदा हातगाड्यांवर गुरुवारी(दि. २०) रोजी कारवाई करण्यात आली. विक्रेत्यांनी विरोध करूनही ही कारवाई पार पाडण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
कारवाईत ७ हातगाड्या, १० लोखंडी स्टैंड, जाहिरात फलक, ४ गॅस शेगड्या तसेच विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, एक पत्राशेड पाडण्यात आले. जप्त केलेले साहित्य नेहरूनगरच्या गोदामात जमा करण्यात आले आहे. कारवाईसाठी पालिकेचे ५ पोलिस, २ बीट निरीक्षक, ५ स्थानिक पोलिस, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारवाईसाठी १ क्रेन, १ जेसीबी, ७ डंपरचा वापर करण्यात आला, अशी माहिती अतिक्रमण पथकप्रमुख सुरेश कोंढरे यांनी दिली.















