- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये यॊग शिबिराचे आयोजन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- २१ जून हा दिवस सन २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये ओंकार, सूर्यनमस्कार व इतर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांनी योगदिनाचे महत्व सांगताना म्हणाले की, योगाच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकास जलदगतीने होतो. विद्यार्थीदशेतच नियमित योगधारणेने नकारात्मकता संपून सकारात्मक विचारांना चालना मिळते. सर्व विद्यार्थी व
शिक्षकांना त्यांनी योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पालक वर्गासाठी तीन दिवसाच्या विशेष योगसत्राचे आयोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांच्या प्रेरणेतून केले गेले. शाळेच्या शिक्षिका सौ. सुलक्षणा फुलारी, सौ अपर्णा सरवटे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व विषद केले.
हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमासाठी समस्त शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.















