न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- प्लास्टिक वापरावर निर्बंध असतांनाही व्यावसायिक वापरासाठी उपयोग करणाऱ्या स्पाईन चौक मोशी परिसरातील व्यावसायिकांकडून सुमारे ८५ किलो प्लास्टिक जप्त करून २३ हजार रुपये दंड वसूल करण्याची कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने आज शनिवार (दि. २२) रोजी केली.
परिसर स्वच्छता व प्लास्टिक निर्मुलन कारवाईच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय यांनी दिल्या असून त्या अंतर्गत सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक आर एम भोसले, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे व वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्पाइन चौक मोशी प्राधिकरण परिसरातील व्यावसायिक अस्थापनांची तपासणी या पथकाने केली. त्यावेळी ऋतिक वाईन्स या दुकानातून सुमारे ८० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.


















