- १९ शिक्षण संस्थांतील १७७ विद्यार्थ्यांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ ऑक्टोबर २०२६) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, यांच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड शहराअंतर्गत आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भाषिक कौशल्ये विकसित करणे आणि सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे या उद्देशाने वक्तृत्व, निबंधलेखन, कथाकथन आणि एकपात्री नाटक अशा चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये एकूण १९ शैक्षणिक संस्थांमधील १७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली प्रतिभा, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. त्याचे उद्घाटन प्रतिभा ज्यूनिअर कॉलेज्या प्राचार्या डॉ . वनिता कुऱ्हाडे समवेत प्रथम नोंदणी करणाऱ्या शिक्षीका तनीषा आंबरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले .
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे...
वक्तृत्व स्पर्धात प्रथम क्रमांक – कु. रविना चौधरी आणि कु. वेदिका विभूते
द्वितीय क्रमांक – कु. सोनाली वाघमारे, तृतीय क्रमांक – कु. सिद्धी माने
निबंध लेखन स्पर्धात प्रथम क्रमांक – कु. जोहा सुलतान मोमीन आणि कु. श्रुती समर्थ स्वामी
द्वितीय क्रमांक – कु. श्रुती बिरादार
तृतीय क्रमांक – कु. गौरी राजू लष्करे, कथाकथन स्पर्धात प्रथम क्रमांक कु. अनुष्का मौर्या
द्वितीय क्रमांक – कु. सुजाता सरोज आणि कु. अंकिता वरुण
तृतीय क्रमांक – कु. सलोनी कांबळे
एकपात्री नाटक स्पर्धात प्रथम क्रमांक – कु. ऐश्वर्या यादव
द्वितीय क्रमांक – कु. नव्या सिंह
तृतीय क्रमांक – कु. कुंजन भाटी
सदर स्पर्धांचे परीक्षण डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. महिमा सिंह , डॉ. सुवर्णा गोगटे, प्रा. गीता कांबळे, प्रा. सुशील भोंग, डॉ. राजश्री ननावरे, डॉ. संतोष उमाठे आणि प्रा. अमोल पाटील यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे सखोल मूल्यमापन करून त्यांच्या गुणवत्तेला योग्य न्याय दिला.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या अशा शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रेरणा मिळत असल्याचे प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी उद्धाटन प्रसंगी सांगितले. त्याच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धाचे नियोजन करण्यात आले . भाषा विभाग प्रमुख प्रा. सुरेखा कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना विचार प्रभावीपणे मांडण्याची, भाषेवरील प्रभुत्व वाढविण्याची, कल्पकतेला वाव देण्याची आणि आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची संधी मिळाली. सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले, तर प्रा. स्नेहल साळवी यांनी आभार प्रदर्शन केले.

















