न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला हॉटेलमधील रुममध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अमित सत्यम (वय २८ रा. भूमकर चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित याने महिलेला व्यवसायाच्या बहाण्याने वाकड येथील एका हॉटेलमधील रुममध्ये बोलवले व लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.
पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अमित सत्यमवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपी अमित याला अटक केली नसून, वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.















