न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजने अंतर्गत फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मातोश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत काळेवाडी येथे या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला बचत गटाच्या प्रमुख व शिवसेना विभाग संघटिका भाग्यश्री म्हस्के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी फॅशन डिझायनर दिपाली पांडे, किरण नाईक, श्वेता शिर्के, वैशाली कुलथे, दिपाली मोरे, रोहिणी सरोदे, जयश्री देवकर, चैताली तांबोळकर, मनीषा मगर, रूपाली धावरे, पूजा मोरे या प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे खंडू शिरसाठ, बाळासाहेब गायकवाड, विभागप्रमुख गोरख पाटील-निलंगेकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांचे सहकार्य लाभले.











